आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅट-रणवीर जरा जपून... \'आजही आमचे एकमेकांवर आहे तितकेच प्रेम\', रणबीर-दीपिकाची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर-दीपिका पदुकोण
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण सध्या 'तमाशा' या आगामी सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. प्रमोशनसाठी दोघे दीपिकाच्या होम टाऊन बंगळुरुमध्ये आहेत. येथे दोघे मस्तीच्या मूडमध्ये दिसले. दोघांनी अनेक फोटोसुध्दा क्लिक केलेत.
अजूनही एकमेकांवर करतात प्रेम-
मीडियासोबत बातचीत करताना रणबीर आणि दीपिकाने त्यांच्या नात्यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. दीपिकाने सांगितले, की ती आजसुध्दा रणबीरवर प्रेम करते आणि त्याच्याविषयी पजेसिव्ह आहे. तसेच रणबीरचे म्हणणे होते, की त्याच्या मनात आजही दीपिकासाठी प्रेम, आदर आणि काळजी आहे. फक्त त्यांची नाते व्यक्त करण्याची पध्दत बदलली आहे.
दिग्दर्शक इत्मियाज अलीचा 'तमाशा' 27 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. यापूर्वी रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी है दिवानी' 2013मध्ये रिलीज झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणबीर आणि दीपिकाचे काही खास फोटो...