आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसला 'बाजीराव-मस्तानी'चा स्टायलिश LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सध्या आपल्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात बिझी आहेत. याचनिमित्ताने हे दोघे नुकतेच एका इव्हेंटमध्ये पोहोचले. इव्हेंट सुरु होण्यापूर्वी दोघांनीही भरपूर फोटो काढले. यावेळी दीपिकाने आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टविषयीदेखील सांगितले.
'बाजीराव-मस्तानी'चा स्टायलिश लूक
या इव्हेंटमध्ये रणवीर ब्लू सूट आणि हॅटमध्ये दिसला. तर दीपिकाने डिझायनर रुतु नीवाचा ऑफ शोल्डर टी लेंथ व्हाइट ड्रेस कॅरी केला होता. सोबत बन्सरीचे इअररिंग्स आणि रॉल्फ लॉरेनचे लेपर्ड प्रिंटेड फुटवेअर घातले होते. दीपिका हा अंदाज लक्ष वेधून घेणारा होता.
हॉलिवूडची तयारी...
अलीकडेच दीपिकाने हॉलिवूड स्टार विन डीजलसोबतचे एक छायाचित्र शेअर केले होते. त्यावरुन ती लवकरच हॉलिवूडमध्ये झळकणार असे अंदाज बांधले गेले होते. याविषयी ती म्हणाली, विन डीजल माझा खूप चांगला मित्र आहे. ''जे काही ठरेल, ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. हॉलिवूडमध्ये काम करण्याविषयी ती म्हणाली, महिला जन्मापासूनच मल्टी टास्किंग असतात. मग तिथे काम करण्यात वाईट ते काय.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दीपिका आणि रणवीरचा क्लिक झालेला खास अंदाज...
बातम्या आणखी आहेत...