आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरने लाँच केले 60 फूट लांब पोस्टर, म्हणाला, 'बाजीराव...'साठी आहे नर्व्हस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील गोरेगाव परिसरात अभिनेता रणवीर सिंगने अलीकडेच 'बाजीराव मस्तानी'चे पहिले सोलो पोस्टर लाँच केले. 60 फूट लांब या भव्यदिव्य पोस्टवर सिनेमाचा लीड अॅक्टर रणवीर सिंहचा वॉरिअर लूक दिसतोय. या इव्हेंटमध्ये रणवीर मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्याने सिनेमातील डायलॉग्स म्हटले आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
'बाजीराव...'साठी नर्व्हस आहे रणवीर
येत्या 18 डिसेंबर रोजी 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' हे दोन बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत. या सिनेमांच्या क्लॅशविषयी रणवीरला प्रश्न विचारले गेले. तो म्हणाला, ''चाहत्यांना बाजीराव... पसंत पडेल की नाही, याविषयी मी नर्व्हस आहेस. गेल्या एक-दीड वर्षांपासून या सिनेमासाठी आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना एक चांगला अनुभव देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे.''
दीपिका माझ्यासोबतच दिसते हॉट
इव्हेंटमध्ये जेव्हा 'तमाशा'मध्ये रणबीर कपूर-दीपिका पदुकोण आणि 'बाजीराव-मस्तानी'मध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीविषयी रणवीरला प्रश्न विचारला गेला. तेव्हा तो म्हणाला, हे काही विचारणे झाले. दीपिका फक्त माझ्यासोबतच हॉट दिसते.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा 18 डिसेंबरला मुव्ही स्क्रिन्सवर दाखल होत असून यामध्ये रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा मेन लीडमध्ये आहेत. याच दिवशी शाहरुख-काजोल स्टारर 'दिलवाले' हा सिनेमासुद्धा रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटमध्ये क्लिक झालेली रणवीर सिंहची झलक...
बातम्या आणखी आहेत...