आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सागरिका-झहीरचा झाला साखरपुडा, सचिनसह पोहोचले बॉलिवूड सेलेब्स आणि क्रिकेटपटू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - मंदिरा बेदी, सागरिका-झहीर खान, सचिन-अंजली तेंडूलकर, प्राची देसाई - Divya Marathi
डावीकडून - मंदिरा बेदी, सागरिका-झहीर खान, सचिन-अंजली तेंडूलकर, प्राची देसाई
23 मे रोजी मुंबईत अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याला क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून सागरिका आणि झहीरला शुभेच्छा दिल्या. 

ग्रीन आउटफिटमध्ये सागरिका तर लाइट ब्राउन सुटमध्ये दिसला झहीर,,,
साखरपुड्यासाठी सागरिकाने ग्रीन कलरच्या डिझायनर आउटफिटची तर झहीरने लाइट ब्राउन कलरचच्या सूट निवड केली होती. शाहरुख खान स्टारर चक दे इंडिया या सिनेमामुळे सागरिका प्रसिद्धीझोतात आली असून तिने मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू पोहोचले साखरपुड्याला...
झहीर आणि सागरिकाच्या साखरपुड्याला रियालन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी, अभिनेत्री प्राची देसाई, सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली, मंदिरा बेदी, सना खान, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया, रवीना टंडन  रोहित शर्मा, अंगद बेदी, नोरा फतेही, अमित मिश्रा, आशिष मेहरा,  युवराज सिंह, अजिंक्य रहाणेसह अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
 
'चक दे इंडिया'मुळे मिळाली सागरिकाला ओळख
- सागरिकाला पहिला लीड रोल मिळाला तो 2012 साली आलेल्या 'रश' या सिनेमात. यामध्ये इमरान हाश्मीसोबत ती झळकली होती. सागरिकाने इमरानसोबत बरेच बोल्ड आणि किसींग सीन्स दिले होते.
- सागरिकाला खरी ओळख मिळवून दिली ती ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील प्रीती सभरवाल या भूमिकेने. या सिनेमामुळे हा मराठमोळा चेहरा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला.  
- हिंदीत तिने चक दे इंडिया (2007), फॉक्स (2009), मिले ना मिलें हम (2011)जी भरके जी ले (2015), दीदारियां (2015) आणि इरादा (2017) या सिनेमांमध्ये काम केले.
-  2013 मध्ये आलेल्या प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमात सागरिका अभिनेता अतुल कुलकर्णींसोबत झळकली होती. 
- फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी सीजन-6 (2015) ची स्पर्धक राहिलेली सागरिका नॅशनल लेवलची अॅथलीटसुद्धा आहे. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, सागरिका आणि झहीर यांच्या साखरपुड्याला पोहोचलेल्या बॉलिवूड सेलेब्स आणि क्रिकेटपटूंचे खास फोटोज...   
बातम्या आणखी आहेत...