आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान म्हणाला - 'माझे असो वा इतर कुणाचे, रेकॉर्ड हे तुटायलाच हवे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाने यशाचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा पसंत पडतोय. याचा आनंद साजरा करण्यासाठी सिनेमाच्या टीमने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. येथे त्यांनी मीडिया आणि प्रेक्षकांना धन्यवाद दिले.
या इव्हेंटमध्ये सलमान आणि सूरज मस्तीच्या मूडमध्ये दिसले. आपल्या दुहेरी भूमिकेशी संबधित अनेक मजेशीर गोष्टी सलमानने यावेळी शेअर केल्या.
तुटण्यासाठीच बनतात रेकॉर्ड्स
'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे अनेक जुने रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत. यामध्ये शाहरुख खान आणि आमिर खानच्या सिनेमांच्या नावांचा समावेश आहे. याविषयी सलमान म्हणाला, "रेकॉर्ड तुटायलाच हवे. मग तो माझा असो वा इतर कुणाचा."
हॉलिवूडमध्ये जाणार नाही
भविष्यात कधी हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करायला आवडेल का, असा प्रश्न यावेळी सलमानला विचारला गेला. याचे उत्तर देताना तो म्हणाला, ''मला हिंदीत डायलॉग म्हणायला आवडतात. येथे मी आनंदी आहे. येथे लोक माझा आदर करतात. तेथे जाणे म्हणजे पुन्हा शुन्यातून विश्व निर्माण करण्यासारखे आहे. मला असं वाटतं, की बॉलिवूड इंडस्ट्रीच एवढी मोठी व्हावी की हॉलिवूड अॅक्टर्स येथे येऊन काम करतील.''
सगळ्यांची पसंत सारखी नसते
'प्रेम रतन धन पायो'ने नक्कीच कमाईचे अनेक नवीन रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत. मात्र या सिनेमाला बघून नाक मुरडणारे लोकही काही कमी नाहीत. याविषयी सलमान म्हणाला, ''हे होणे अपेक्षित होते. सगळ्यांच्या पसंती वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची प्रतिक्रिया सारखी नसते.''
'तमाशा'सोबत स्पर्धा नाही
आता या आठवड्यात इम्तियाज अली दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-दीपिका पदुकोण स्टारर 'तमाशा' हा सिनेमा रिलीज होणारेय. या सिनेमामुळे PRDP च्या बिझनेसवर परिणाम होईल का.. याचे उत्तर देताना दिग्दर्शक सूरज बडजात्या म्हणाले, माझा सिनेमा चांगला असेल तर लोक नक्कीच वारंवार तो बघतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटची काही छायाचित्रे...