आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Richa And Randeep Does Kiss At The Press Conference

Promotional Funda: पत्रकार परिषदेत इंटिमेट झाले रिचा-रणदीप, केले Kiss

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिचा चढ्डा आणि रणदीप हुड्डा)
मुंबई- रणदीप हुड्डा आणि रिचा चढ्डाने 'मै और चार्ल्स' सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. सिनेमामध्ये मनमौजी आशिकचे पात्र साकारणारा रणदीप येथेसुध्दा रोमँटिक मूडमध्ये दिसला. स्टेजवर एंट्री करताना तो रिचाकडे आला आणि तिच्यासोबत इंटीमेट झाला. त्यानंतर या जोडीने किस केले. यादरम्यान त्यांनी मीडियाच्या कॅमे-याचीसुध्दा पर्वा केली नाही.
स्टार्स सिनेमा प्रमोट करण्यासाठी विविध फंडे करत आहेत. परंतु या जोडीने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडून खुलेआम एकमेकांना किस केले. इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या रणदीपच्या हातात हातकडी होती. स्टेजवर आपल्या रिचाला किस केल्यानंतर तिने त्यात्या हातकड्या काढल्या.
रिचाचे बोल्ड उत्तर ऐकून रणदीप झाला इम्ब्रॅरस-
एका रिपोर्टरने रिचाला विचारले, की इतक्या बोल्ड भूमिका साकारण्यासाठी तिला आपल्या पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी कोणत्या अचडणींचा सामना करावा लागतो? यावर रिचाने सिनेमाच्या डायलॉगमध्ये उत्तर दिले. रिचा म्हणाली, 'यांच्याकडे पाहा, कुणाला यांच्यासोबत सेक्स करावे वाटणार नाही.' रिचाचे हे बोल्ड उत्तर ऐकून रणदीप म्हणाला, 'मला इम्ब्रॅरस करणे बंद कर.'
रणदीप हुड्डा, रिचा चढ्डा, आदिल हुसैन आणि टिस्का चोप्रा स्टारर या सिनेमाचे दिग्दर्शन प्रवाल रमनने केले आहे. 'बिकिनी किलर' नावाने प्रसिध्द चार्ल्स शोभराज यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा 30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्रेलर लाँचवेळी रणदीप हुड्डा आणि रिचा चढ्डाचे फोटो...