आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sachin Tendulkar Daughter Sara Grab All Attention In Sachin A Billion Dreams Premiere

\'सचिन : अ बिलियन ड्रीम्स\'च्या प्रीमिअरला भाव खाऊन गेली सचिनची लाडकी लेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा जीवनपट ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमातून उलगडण्यात आला आहे. येत्या 26 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. बुधवारी क्रिकेट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत सिनेमाचा ग्रॅण्ड प्रीमिअर पार पडला. अगदी महेंद्रसिंह धोनीपासून, विराट कोहलीपासून ते बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, जॉन अब्राहम, श्रेया घोषालपर्यंत अनेक सेलिब्रिटी सचिनचा जीवनप्रवास सिल्व्हर स्क्रिनवर बघण्यासाठी प्रीमिअरला उपस्थित होते. 

एवढ्या दिग्गजांमध्ये सर्वाधिक भाव खाऊन गेली ती सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर. ब्लॅक कलरच्या जंपसूटमध्ये सारा अतिशय सुंदर दिसली. यावेळी मीडियासमोरचा साराचा वावर बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींना मागे टाकणारा होता. यावेळी सचिनसुद्धा आपल्या लाडक्या लेकीकडे विशेष लक्ष देताना दिसला.   सचिनच्या फिल्मच्या स्क्रिनिंगला अवतरले तारांगण, सलमानला वगळता पोहोचले अनेक Celebs
 

आता 20 वर्षांची आहे सारा 
- 12 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेली सारा आता 20 वर्षांची आहे. 
- सारा मोस्ट पॉप्युलर क्रिकेटक किड आहे.
- ग्लॅमरस लूक आणि उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी साराला ओळखले जाते. 
- सारा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र स्वतः सचिन तेंडुलकरने ही गोष्ट नाकारली होती. सारा सध्या शिक्षणाकडे लक्ष देत असल्याचे सचिनने म्हटले होते. 
- क्रिकेट जगतात अनेकांसाठी सचिन आदर्श आहे. पण सचिनला खासगी आयुष्यात त्याला त्याची मुलगी साराकडून प्रेरणा मिळत असल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या प्रीमिअरला क्लिक झालेले साराचे वेगवेगळे मूड्स... 
 
बातम्या आणखी आहेत...