आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Inside Party Pics : सागरिका-झहीरच्या ग्रॅण्ड रिसेप्शनला जोडीने पोहोचले विराट-अनुष्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान याच महिन्यात 23 तारखेला विवाहबद्ध झाले. नोंदणीपद्धतीने दोघांनी लग्न केले. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर लगेचच त्यांनी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसाठी कॉकटेल पार्टी ठेवली होती. त्यानंतर मेंदी आणि संगीत कार्यक्रमदेखील जल्लोषात झाले. या सेलिब्रेशननंतर सागरिका आणि झहीर यांनी मुंबईतील कोलाबास्थित  'द ताज महल पॅलेस'  या पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. 
पारंपरिक पोशाखात हे नवदाम्पत्य अतिशय सुंदर दिसले. यावेळी झहीरने निळ्या रंगाचा बंदगळा कुर्ता घातला होता तर सागरिकाने आयव्होरी आणि सब्यासाचीने डिझाइन केलेला सुंदर लहेंगा परिधान केला होता. अभिनेत्री बिना काक आणि त्यांची कन्या अमृता काक यांनी या रिसेप्शनचे इनसाइड फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. अभिनेत्री सुश्मिता सेन, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया, 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री चित्राशी यांनी रिसेप्शनला उपस्थिती लावली होती. 


पाहुयात, कसा होता सागरिका आणि झहीर यांच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचा थाट 

बातम्या आणखी आहेत...