एन्टरटेन्मेंट डेस्कः संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या 'सैराट' या सिनेमाची भूरळ बॉलिवूडलासुद्धा पडली आहे. नुकताच या सिनेमाने 85 कोटींची बक्कळ कमाई तिकिटबारीवर केली. यानिमित्ताने शनिवारी मुंबईत जंगी पार्टीसुद्धा झाली. त्यानंतर सोमवारी बॉलिवूड सेलिब्रिटीसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अनेक हिंदी सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
कोणकोण पोहोचले स्क्रिनिंगला...
'सैराट' हा मराठी सिनेमा बघण्यासाठी अभिनेत्री आलिया भट, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता वरुण धवन, रणबीर कपूर, करण टॅकर हे सेलेब्स आवर्जुन पोहोचले होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासुद्धा स्क्रिनिंगस्थळी दिसले. इतकेच नाही तर अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानसुद्धा पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावताना दिसली. या सेलिब्रिटींनासुद्धा आर्ची-परशाची प्रेमकहाणी बघण्याचा मोह आवरता आला नाही, असेच म्हणावे लागेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'सैराट'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...