आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Celebrate Bakrid And Kareena Celebrate Ganesh Utsav

पतौडी पॅलेसमध्ये सैफ-करीना, 'नवाब'ने साजरी केली ईद तर 'बेगम'ने केली बाप्पाची पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पतौडी पॅलेसमधून बाहेर येताना सैफ करीना)

गुडगाव- ईद उल जुहाच्या निमित्तावर शुक्रवारी (25 सप्टेंबर) पतौडी पॅलेसच्या दहावा नवाब सैफ अली खानने पॅलेस परिसरात बनलेल्या घराणशाही इब्राहिम मस्जिदमध्ये नमाज अदा केली. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर बेगम करीना कपूरने पॅलेसमध्येच गणपती बाप्पाची पूजा केली.
सैफीनाच्या लग्नानंतर पहिल्यांदा करीना कपूरने सासरी अर्थातच पॅलेसमध्ये एक आठवडा घालवला. बेगमने आपला 35वा वाढदिवस येथेच सेलिब्रेट केला. यादरम्यान सैफ-करीना मरहूम नवाब मन्सूर अली खानच्या पतौडी ट्रस्टव्दारा बनवलेल्या वेणू आई हॉस्पिटलमध्ये गेले होते. यावेळी करीना आणि सैफने डोळेसुध्दा चेक करून घेतले.
सैफ बाहेर निघताच लोकांनी त्याला घेरले. सैफने हात हालवून त्यांचे अभिवादन स्वीकारले. तसेच सैफने आपल्या चाहत्यांशी आणि पतौडी बावनीच्या लोकांशी रस्त्याने चालताना बातचीत केली, त्यांची विचारपुस केली. सैफ अली खानसह करीनासुध्दा लोकांसोबत बातचीत करताना दिसली. गेटवर पोहोचल्यानंतर दोघांनी लोकांना सलाम केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफ आणि करीनाचे फोटो...