Home »Party» Salman Helen And Other Celebs Flying New York For IIFa

IIFA : आईसोबत रवाना झाला सलमान, पत्नी-मुलीसोबत न्यूयॉर्कला पोहोचला शाहीद

दिव्य मराठी वेब टीम | Jul 12, 2017, 15:20 PM IST

मुंबईः येत्या 13 ते 15 जुलै या काळात न्यूयॉर्क येथे 18 वा आयफा अवॉर्ड्स सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अभिनेता सलमान खआन आई हेलनसोबत न्यूयॉर्कला रवाना झाला आहे. यांच्या व्यतिरिक्त वरुण धवन, आलिया भट, प्रीती झिंटा, नवाजुद्दीन सिद्दीकी हे सेलिब्रिटीसुद्धा या सोहळ्यात सहभागी होणार असून ते न्यूयॉर्कसाठी रवाना झाले. तर दुसरीकडे शाहिद कपूर, सैफ अली खान, करण जोहर आणि मनीष पॉल हे सेलिब्रिटी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत.

सैफ आणि करण जोहर करणार अवॉर्ड शो होस्ट...
यंदाचा आयफा सोहळा सैफ अली खान आणि करण जोहर ही जोडी होस्ट करणार आहे. तर वरुण धवन, सलमान खान, आलिया भट, कतरिना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन हे सेलिब्रिटी या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. म्युझिक इंडस्ट्रीत ए. आर. रहमान यांना 25 वर्षे पूर्ण होणार असून यानिमित्ताने 14 जुलै रोजी 'आयफा रॉक्स' 2017 चे आयोजन केले होते. या कार्यक्रम मनीष पॉल आणि रितेश देशमुख होस्ट करणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा, मुंबई आणि न्यूयॉर्क एअरपोर्टवर क्लिक झालेले बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS...

Next Article

Recommended