आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशनवेळी सलमान म्हणाला, 'बजरंगी भाईजानमुळे परतेल माझ्यातला निरागसपणा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः सलमान खान आणि करीना कपूर खान यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत आपल्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे प्रमोशन केले. यावेळी सलमान-बेबोसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, दिग्दर्शक कबीर खान, गायक अदनान सामी आणि मिका सिंगसुद्धा उपस्थित होते. इव्हेंटमध्ये सल्लू मियाँ मस्तीच्या मूडमध्ये दिसला. सलमानच्या मते, त्याच्या आगामी सिनेमांमुळे त्याच्यातील निरागसपणा परतणार आहे.
इव्हेंटमध्ये सलमान खान व्हाइट शर्ट आणि नेव्ही ब्लू पँटमध्ये दिसली. तर करीनाने रेड अँड ब्लॅक ड्रेस कॅरी केला होता.
मीडियाशी बोलताना सलमानने आशावाद व्यक्त करत म्हटले, ''बजरंगी भाईजान आणि प्रेम रतन धन पायो या सिनेमांमुळे माझ्यातला निरागसपणा परतेल. मी या सिनेमांसाठी फारशी तयारी केली नव्हती. या सिनेमांतील भूमिका साकारण्यासाठी प्रामाणिकपणा आणि निरागसपणाची गरज होती. गेल्या काही काळात मी या दोन्ही गोष्टींपासून दुरावलो होतो. मात्र, आता या चित्रपटांमुळे माझ्यातील निरागसपणा पुन्हा पहायला मिळेल.''
यावेळी सलमानने काश्मीरमध्ये चित्रीकरण करतानाचे अनेक अनुभवही सांगितले. काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव माझ्यासाठी अद्भुत होता. आपल्या देशात काश्मीरसारखी सुंदर जागा असताना आपण तिकडे चित्रीकरण करत नाही, याला आपला मुर्खपणा कारणीभूत आहे का, असा सवालही सलमानने यावेळी उपस्थित केला.
भारत-पाक संबंधावर आधारित असलेला सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. 'बजरंगी भाईजान'मध्ये सलमान खानबरोबर करीना कपूर, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'च्या दिल्ली प्रमोशनची खास छायाचित्रे...