आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रजनीकांत-अक्षयच्या फिल्मचा फस्ट लूक झाला लाँच, निमंत्रण नसताना पोहोचला सलमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः फिल्म 'कबाली'च्या यशानंतर सुपरस्टार रजनीकांत गाजलेल्या रोबोटचा सिक्वेल 2.0' मध्ये झळकणार आहेत. रविवारी मुंबईत या सिनेमाचा फस्ट लूक लाँच करण्यात आला. हा तामिळ सिनेमा सायन्स फिक्शनवर आधारित आहे. लॉन्चिंग इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान विना निमंत्रणच या इव्हेंटमध्ये पोहोचला. रजनीकांतला भेटायला विना इनव्हिटेशन पोहोचला सलमान...
फिल्मच्या फस्ट लूक लाँचवेळी सलमान खान म्हणाला, तामिळ सुपरस्टार रजनीकांत सरांना भेटायची माझी इच्छा होती. त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रण नसताना मी येथे पोहोचलो. सलमानने रजनीकांत यांना 'गरू' म्हणून संबोधित केले. यावेळी रजनीकांत यांनी सलमानला धन्यवाद देताना म्हटले - जर सलमानने होकार दिला, तर मी उद्याच त्याच्यासोबत सिनेमा करेल.
2.0 हा सिनेमा 2010मध्ये आलेला तामिळ ब्लॉकबस्टर 'Enthiran' चा सिक्वेल आहे. हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीत रिलीज होणारेय. या सिनेमात रजनीकांत यांच्यासह अक्षय कुमार, एमी जॅक्सन, सुधांशु पांडेय, आदिल हुसैन आणि माया कृष्णन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. एस शंकर या सिनेमाचे निर्माते आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रजनीकांत यांच्या फिल्म 2.0 च्या फस्ट लूक लाँचचे खास Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...