आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सिनेमाच्या लाँचिंगला आपल्या 'ऑनस्क्रिन भाभी'ला या अंदाजात भेटला सलमान खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत सलमान खान)
मुंबईः अभिनेता सलमान खानने अलीकडेच 'जाणिवा' या आगामी मराठी सिनेमाच्या ट्रेलर
लाँचचा हजेरी लावली होती. या सोहळ्यात एका खास क्षणाचे साक्षीदार होण्याची उपस्थितांना संधी मिळाली. झाले असे की, या सोहळ्याला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही हजेरी लावली होती. 'हम आपके है कौन' या सिनेमात रेणुका शहाणे आणि सलमान खान यांनी वहिनी-दीराची भूमिका साकारली होती. ब-याच दिवसांनी ही जोडी एका मंचावर एकत्र आली होती. यावेळी सलमानने आपल्या ऑनस्क्रिन वहिनीची गळाभेट घेऊन या भेटीचा आनंद व्यक्त केला.
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर 'जाणिवा' या सिनेमाद्वारे सोलो हीरोच्या रुपात मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. यापूर्वी तो 'पोरबाजार' या सिनेमात दिसला होता. लाँचिंगला सलमानने सत्याचे तोंडभरुन कौतुक केले.
राजेश रणशिंगे दिग्दर्शित 'जाणिवा'मध्ये सत्या मांजरेकरसोबत रेणुका शहाणे यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, अतुल परचुरे हे स्टार्सही सिनेमात झळकणार आहेत. येत्या 31 जुलै रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या कार्यक्रमात क्लिक झालेली सलमान आणि रेणुका शहाणे यांची खास छायाचित्रे...