आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईजान सलमानच्या ईद पार्टीत जमली CELEBS ची मांदियाळी, पाहा खास PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रेः डावीकडे - प्रीती झिंटा, उजवीकडे (वर) - सलमान खान आणि सलीम खान, (खाली) - रितेश आणि जेनेलिया देशमुख - Divya Marathi
छायाचित्रेः डावीकडे - प्रीती झिंटा, उजवीकडे (वर) - सलमान खान आणि सलीम खान, (खाली) - रितेश आणि जेनेलिया देशमुख

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाचीही ईद सलमानसाठी खूप स्पेशल ठरली. सिनेमाला मिळालेल्या यशाचा आनंद आणि ईद हे दुहेरी निमित्त साधत सलमानने आपल्या मुंबईस्थित गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पार्टीचे आयोजन केले होते.
शनिवारी अर्थातच ईदच्या दिवशी नमाज अदा केल्यानंतर सलमान त्याचे फॅमिली फ्रेंड एन. एम. कुंजालकर यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित होता. यावेळी सलमानसह संपूर्ण खान कुटुंब त्यांना अखेरचा निरोप द्यायला आले होते.
त्यानंतर संध्याकाळी सलमानने आपल्या कुटुंब आणि बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसोबत ईद साजरी केली. इतकेच नाही तर सलमानच्या चाहत्यांनीसुद्धा त्याला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठी गर्दी केली होती. सलमानने घराच्या बालकनीतून हात उंचावून चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले.
सलमानच्या ईदच्या पार्टीत आमिर खान, कबीर खान, एक्सगर्लफ्रेंड संगीता बिजलानी, प्रीती झिंटा, एली अवराम, रितेश-जेनेलिया देशमुख, डेजी शाह, झरीन खान, वत्सल सेठ, आदित्य पांचोलीसह अनेक सेलेब्स जमले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमानच्या ईद पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...