आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बाप्पाला निरोप देताना सलमानने धरला ताल, अलविरासोबत थिरकली हुमा कुरैशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाप्पाला निरोप देण्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात थिरकताना सलमान खान, अलविरा, हुमा कुरैशी, सोहेल खान आणि आयुष शर्मा. - Divya Marathi
बाप्पाला निरोप देण्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात थिरकताना सलमान खान, अलविरा, हुमा कुरैशी, सोहेल खान आणि आयुष शर्मा.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खानच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते. दरवर्षी दीड दिवसांसाठी बाप्पा सलमानच्या घरी वास्तव्याला असतो. शुक्रवारी सलमान आणि त्याच्या कुटुंबियांनी आपल्या घरच्या 'विघ्नहर्त्या'ला वाजत गाजत निरोप दिला. आपल्या घरच्या बाप्पाचे घराच्या जवळच निर्माण करण्यात आलेल्या एका कृत्रिम तलावात सलमान आणि सोहेलने विसर्जन केले.
सलमानने आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती. ढोल-ताशांचा गजर सुरू होता... या ढोल - ताशांवर सलमान खाननंही ताल धरला. सलमानच नव्हे तर त्याची बहीण अलविरा, अभिनेत्री हुमा कुरैशी आणि सोहेल खान हेदेखील ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरताना दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरतानाची सलमानसोबत इतर सेलिब्रिटींची छायाचित्रे...