आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या घरी शाहरुखने एन्जॉय केली लेट नाइट पार्टी, जाताना अशी घेतली गळाभेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: दीर्घ कोल्डवॉरनंतर सलमान खान आणि शाहरुख खान आता मित्र झाले आहेत. हे दोघेही अनेकदा पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये एकत्र दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने कोल्डप्ले बॅण्डसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर झालेल्या या पार्टीत सलमान सहभागी झाला होता. आता सोमवारी रात्री सलमानने होस्ट केलेल्या पार्टीत शाहरुख सहभागी झाला होता. शाहरुखने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घालवले 4 तास

सलमानची घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या या पार्टीत शाहरुखने रात्री 12 वाजता एन्ट्री घेतली. पहाटे 4 वाजेपर्यंत सलमानसोबत शाहरुखने पार्टी एन्जॉय केली. शाहरुखला सलमानने See-off केले. कारमध्ये बसण्यापूर्वी शाहरुखने सलमानची गळाभेटही घेतली. याकाळात सलमान दिग्दर्शक कबीर खानचा सिनेमा 'ट्यूबलाइट' आणि रिअॅलिटी शो 'बिग बॉस 10'मध्ये बिझी आहे. तर शाहरुख 'रईस' या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. नुकताच शाहरुखचा 'डिअर जिंदगी' हा सिनेमा रिलीज झाला. हे सेलिब्रिटी पोहोचले पार्टीत...
शाहरुखशिवाय सलमानच्या पार्टीत सुनील शेट्टी, सूरज पंचोली, डॅनी डेन्जोंगपाचा मुलगा रिंगिंग, प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला, फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला सहभागी झाले होते. सलमानचे दोन्ही भाऊ सोहेल-अरबाज, पुतणे निर्वाण-अरहान यांच्यासोबत सलमानची बहीण अलविर आणि तिचा नवरा अतुल अग्निहोत्री पार्टीत पोहोचले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सलमानच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे Photos...
बातम्या आणखी आहेत...