आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने लॉन्च केली आशा यांची बायोग्राफी, धर्मेन्द्र-जितेंद्रसोबतच दिसले हे सेलेब्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एव्हरग्रीन अॅक्ट्रेस आशा पारेख यांची बोयाग्राफी 'द हिट गर्ल' काल लॉन्च करण्यात आली. बांद्रा येथील हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये झालेल्या या इव्हेंटमध्ये अनेक बॉलीवुड सेलब्रिटी उपस्थित होते. हे पुस्तक आशा पारेख आणि फिल्म क्रिटिक खालिद मोहम्मद यांनी लिहिले आहे. या प्रसंगी सलमान म्हणाला की, आशा आंटी माझ्या खुप जवळची आहे. यासोबतच तो म्हणाला की, आपल्या जेनरेशनला विशेषतः मुलींनी आशाजी आणि जुन्या लोकांसोबत मैत्री करुन त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. मी आणि शाहरुख चांगले मित्र आहोत परंतु...
 
सलमान म्हणाला की, सायरा आंटी, साधना आंटी आणि शम्मी आंटी हे सर्व क्लोज फ्रेंड आहेत. मला वाटते की, यांची फ्रेंडशिप एक चांगले उदाहरण आहे. खरेतर आपल्या जनरेशन मध्ये ती गोष्टी आता दिसत नाही. आपल्या आणि शाहरुखच्या मैत्रीवर बोलताना सलमान हसत म्हणाला की, शाहरुख आणि मी चांगले मित्र आहोत, परंतु त्या काळातील मैत्रीची गोष्टच निराळी होती. 'द हिट गर्ल' या पुस्तकामध्ये आशा पारेखने जीवनाचे चढ-उतार खुप चांगल्या प्रकारे दाखवले आहेत.
 
या प्रसंगी आशा पारेख आणि सलमान व्यतिरिक्त वहीदा हरमान, धर्मेद्र, अरुणा ईरानी, हेलन, जॅकी श्रॉफ आणि इमरान खान सोबतच अनेक बॉलीवुड सेलेब्रिटी उपस्थित होते..
.
पुढील 15 स्लाइड्सवर पाहा, आशा पारेखच्या बायोग्राफी लॉन्चिंगचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...