आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan : No Arranged Marriage, Back To Love

साँग लाँचिंगला सलमान म्हणाला, \'मॅरेज कॅन्सल लव्ह इज बॅक\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः शुक्रवारी सलमान खानने आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'मधील 'आज की पार्टी...' हे नवीन गाणे लाँच केले. या इव्हेंटमध्ये सलमान खान ब्लू शर्ट अँड डेनिम्स हॅण्डसम दिसला. शिवाय तो खूप चांगल्या मूडमध्येही होता. यावेळी त्याला पत्रकारांनी लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज करणार असा प्रश्न विचारला गेला, त्यावर सलमान म्हणाला, "मॅरेज कॅन्सल लव्ह इज बॅक." असे सांगून सलमानने आपल्या चाहत्यांच्या मनात नवीन उत्सुकता निर्माण केली हे नक्की. आता सलमानच्या आयुष्यात परतलेली प्रेमिका कोण? हे लवकरच उघड होईल, असे दिसतंय.
मुंबईतील जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये सलमानसोबत दिग्दर्शक कबीर खान, संगीतकार प्रीतम आणि गायक मीका सिंह उपस्थित होते. येथे सलमानने मीका सिंहसोबत 'आज की पार्टी...' हे गाणेही सादर केले.
'बजरंगी भाईजान' 17 जुलै रोजी रिलीज होणारेय. या सिनेमात सलमानसोबत करीना कपूर खान मेन लीडमध्ये झळकणारेय.
पुढे पाहा, साँग लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...