आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Salman Khan On A Movie Date With Aishwarya Rai Lookalike And Protegee Sneha Ullal

PHOTOS : ऐश्वर्यासारख्या हुबेहुब दिसणा-या स्नेहा उलालसोबत सलमानची मुव्ही डेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान, स्नेहा उलाल आणि डेजी शाह)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खान या काळात नॉस्टेल्जिक झाल्याचे दिसून येतंय. त्याचे कारण म्हणजे हा अभिनेता आपल्या जुन्या फ्रेंड्ससोबत आउटिंग करताना दिसतोय. उदाहरणार्थ, सलमान खान ब-याच दिवसांनी स्नेहा उलालसोबत सिनेमा बघायला पोहोचला होता.
स्नेहा उलालला तुम्ही ओळखलंच असेल नाही का. बरोबर ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहुब दिसणारी ही अभिनेत्री आहे. सलमाननेच तिला 'लकी' या सिनेमाद्वारे इंडस्ट्रीत लाँच केले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका मल्टीप्लेक्समध्ये सलमान आणि स्नेहा उलाल 'ज्युरासिक वर्ल्ड' हा हॉलिवूड सिनेमा बघायला पोहोचले होते.
स्नेहासोबतच अभिनेत्री डेजी शाहसुद्धा हा सिनेमा बघायला पोहोचली होती. याशिवाय सलमानची बहीण अलविरा, तिचा पती अतुल अग्निहोत्री, पुलकित सम्राट आणि त्याची पत्नी श्वेतासुद्धा मल्टिप्लेक्समध्ये दिसले.
सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा येत्या 17 जुलै रोजी रिलीज होतोय. करीना कपूर खान या सिनेमात सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मल्टिप्लेक्समध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...