आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या प्रश्नावर भडकला सलमान, MAMIमध्ये पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि जॅकी श्रॉफ - Divya Marathi
सलमान खान आणि जॅकी श्रॉफ

मुंबईत आयोजित MAMI फेस्टिवलची नुकतीच सांगता झाली. यावेळी अभिनेता सलमान खानची विशेष उपस्थिती होती. रेड कार्पेटवर अवतरलेल्या सलमानला पत्रकारांनी शाहरुखच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारताच त्याचा पारा चढला. सलमान म्हणाला, "येथे आपण MAMI साठी आलो आहोत, तर त्यावरच बोला. हा असा मंच नाही, जेथे कोणत्याही विषयावर चर्चा होईल. मी काही बोललो तर तुम्ही त्याचा काही वेगळा अर्थ काढाल. मग येथे बोलावेच का. तुम्ही माझ्या माध्यमातून आपल्या चॅनलला का स्पॉन्सर करु इच्छिता? आता जे सुरु आहे, ते चालू द्या. नंतर याविषयावर बोलण्यासाठी मी नक्की तुम्हाला संधी देईल."
विद्या-सैफ-रितेशने लावली हजेरी
MAMI 2015 च्या सांगता सोहळ्याला अभिनेत्री विद्या बालन तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत पोहोचली होती. अभिनेता रितेश देशमुख, सैफ अली खान, कुणाल कपूर, जॅकी श्रॉफ, कल्कि कोचलिन, किरण राव, नंदिता दास, ईशा गुप्ता, राधिका आपटे हे सेलिब्रिटीसुद्धा रेड कार्पेटवर दिसले. MAMIची अध्यक्षा किरण राव आणि फेस्टिव्हल डायरेक्टर अनुपमा चोप्रा यांनी या कार्यक्रमाची सूत्र सांभाळली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा MAMI च्या सांगता सोहळ्यात पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...