आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत सलमानने पोहोचला \'बाहुबली\'च्या स्क्रिनिंगला, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संगीता बिजलानी आणि सलमान खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अलीकडेच 'बाहुबली' सिनेमा बघितला. हा सिनेमा बघायला सलमान एकटा नव्हे तर आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत पोहोचला होता. एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिच्यासोबत एकाच गाडीतून सलमान थिएटरमध्ये पोहोचला. यावेळी त्यांच्या कारमध्ये अभिनेत्री डेजी शाहसुद्धा दिसली.
या तिघांव्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेकजण सध्या गाजत असलेला 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगला आले होते. यामध्ये एली अवराम, वरुण धवन, निकितन, निखिल द्विवेदी, डेविड धवन, स्नेहा उलाल. अलविरा खान, अतुल अग्निहोत्री, स्नेहा उलाल, सूरज पांचोली, पुलकित सम्राट आणि त्याची पत्नी या सेलिब्रिटींचा समावेश होता.
'बाहुबली' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले असून केवळ दोन दिवसांत शंभर कोटींची कमाई केली आहे. प्रभास, राणा डुग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया या कलाकारांच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...