आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Walks The Ramp With Sonam Reveals Hez Very Uncomfortable With Clothes

कपड्यांत अनकर्म्फटेबल फिल करतो सलमान, घरातही फिरतो Shirtless

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर आणि सलमान खान
अहमदाबाद- 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी सलमान खान आणि सोनम कपूरने शनिवारी (31 ऑक्टोबर) अहमदाबादच्या आयआयएममध्ये आयोजित खादी फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. सोनम-सलमान यावेळी दोन वेगळ्या आऊटफिट्समध्ये दिसले.
पहिला अॅपीयरेन्ससाठी सलमान-सोनमने डिझाइनर रोहित बलचा आऊटफिट्स परिधान केला होता. सलमान ब्लॅक खादी कुर्ता-पायजमासोबत मॅचिंग बंडीमध्ये दिसला. तसेच सोनम क्रिम लाँग फ्रॉक गाऊनसह फुल स्लीव्ज जॅकेटमध्ये दिसली. दुस-या अॅपीयरेन्समध्ये सोनम डिझाइनर नम्रता सोनीचे अटायर तर सलमान खादी शेरवानी आणि कोटी लुकमध्ये स्पॉट झाले.
कपड्यांत अनकर्म्फटेबल फिल करतो सलमान-
मीडियाशी बातचीत करताना सलमान खानने सांगितले, की त्याला कमीत-कमी कपडे घालायला आवडते. जास्त कपडे परिधान केले तर त्याला अनकर्म्फटेबल वाटते. सलमानने सांगितले, 'मला कपड्यांत अनकर्म्फटेबल वाटते. कपडे घालताच मला वेगळेच फिल होते. तुम्ही कधी माझ्या घरी आले तर स्वत: पाहा. मीच नव्हे माझे वडीलसुध्दा असेच आहेत. आम्हाला कमी कपडे घालण्याची सवय आहे. उदाहरणार्थ, बनियान, शर्ट किंवा शर्टलेस राहतो.'
सूरज बडजात्याच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा 'प्रेम रतन धन पायो' सिनेमा 12 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खादी फॅशन शोदरम्यान सलमान खान आणि सोनम कपूरचे फोटो...