आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी जयपूरमध्ये पोहोचला संजय दत्त, ठुमके लावताना दिसली तनिषा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरः अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले इब्राहिम, इकारासोबत सोमवारी जयपूरमध्ये पोहोचला. निमित्त होते संजयचा खास मित्र आणि चित्रपट वितरक राज बन्सल यांच्या मुलाच्या लग्नाचे. राज बन्सल यांचा मुलगा अभिमन्यूचा जयपूरमध्ये शाही थाटात लग्नसोहळा संपन्न होतोय.

कोणकोणते स्टार्स पोहोचले लग्नात...

- या लग्नात ग्लॅमर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यामध्ये अजय देवगण, काजोल, तिनषा मुखर्जी यांच्या नावाचा समावेश आहे,.
- संगीत सेरेमनीत अभिनेते ऋषी कपूरसुद्धा सहभागी झाले होते.
- संगीत सेरेमनीत तनिषा मुखर्जी ठुमके लावताना दिसली. याशिवाय तिने हातावर मेंदीसुद्धा काढून घेतली.
- सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नात सहभागी होण्यासोबतच संजय आपल्या कुटुंबासोबत जयपूरमध्ये फेरफटका मारणार आहे.
- तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदाच आपल्या कुटुंबासोबत मुंबईबाहेर फिरायला आला आहे.

कोण आहे राज बन्सल?
- राज बन्सल जयपूरमधील एक नामांकित बिझनेसमन आहेत.
- ते येथील अनेक मल्टीप्लेक्सचे मालक असून चित्रपट वितरणाचेही काम बघतात.
- याशिवाय ते लेखक आणि चित्रपट समीक्षकदेखील आहेत.
- संजय दत्तसोबतचे त्यांचे नाते खूप खास आहे. राज नेहमीच संजयसोबतची छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत असतात.
राजस्थानी अंदाजात होतोय लग्नसोहळा...
- हे लग्न जयपूरच्या एका फार्म हाऊसमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
- या लग्नात हेरिटेज लूकवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. लग्नानंतर रिसेप्शन जयपूरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लग्नात सहभागी होण्यास जयपूरमध्ये पोहोचलेल्या संजय दत्तची खास छायाचित्रे...