आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरे अमिताभ बच्चन आणि रेखासोबत दिसली ऐश्वर्याची स्ट्राँग बाँडिंग, बघा Inside Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शनिवारी रात्री मुंबईत फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अलीकडेच बी टाऊनमध्ये पदार्पण करणारा हर्षवर्धन कपूरसह अनेक दिग्गज पोहोचले होते. या अवॉर्ड सोहळ्यात सेलिब्रिटींना स्टाइल आणि ग्लॅमरसाठी सन्मानित करण्यात आले. यावेळी अमिताभ बच्चन यांना टाइमलेस स्टाइल अँड ग्लॅमर आयकॉन (मेल) अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चनची मोस्ट ग्लॅमरस स्टार (फिमेल) म्हणून निवड झाली.
या अवॉर्ड सोहळ्यात ऐश्वर्या ब्लॅक गाऊनमध्ये खूप सुंदर दिसली. तर पिंक गाऊनमध्ये कतरिनाने रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया बट, सिद्धार्थ मल्होत्रा, सुशांत सिंह राजपूत, हर्षवर्धन कपूर, बिपाशा बसू, करण सिंह ग्रोवर, दिशा पटानी, एमी जॅक्सन, सूरज पंचोली, जोया अख्तर, प्राची देसाई, अक्षरा हासन, रेखा, झीनत अमान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्स हजर होते.
या अवॉर्ड सोहळ्यात ऐश्वर्या तिचे सासर अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा मारताना दिसली. तर सुशांत सिंह राजपूत बिग बींसोबत सेल्फी घेताना. या सोहळ्यात अभिनेत्री रेखासोबत ऐश्वर्याचे स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळाले. रेखाच्या हस्ते ऐश्वर्याला मोस्ट ग्लॅमरस स्टार (फिमेल) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या अवॉर्ड नाइटमधील Inside Photos बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...