बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'फॅन' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एका खास शोचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडची मांदियाळी जमली होती.
माधुरी दीक्षित, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, तब्बू, भूमी पेडणेकर, वलुश्वा डिसुजा, साकिब सलीम, मिनी माथूर, ताहिर भसीन यांच्यासह अनेक स्टार्स शाहरुखचा फॅन बघायला पोहोचले होते. विशेष म्हणजे या स्क्रिनिंगला स्वतः शाहरुख हजर होता. यावेळी तब्बू, परिणीती चोप्रा या अभिनेत्री विदाउट मेकअप कॅमे-यात क्लिक झाल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...