आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Srk सोबत रॅम्पवर अवतरली अनुष्का, चॅरिटी शोमध्ये काजोल-सुश्मितासह पोहोचले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई:  प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी रविवारी रात्री मुंबईत मिजवान समर 2017 या चॅरिटी शोचे आयोजन केले होते. या शोसाठी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनी रॅम्प वॉक केला. शाहरुख-अनुष्का यांनी मनीष मल्होत्राचे आऊटफिट रॅम्पवर शो-केज केले. अनुष्का-एसआरकेची जोडी लवकरच दिग्दर्शक इम्तियाज अलींच्या आगामी 'रहनुमा' या सिनेमात झळकणारेय. 

काजोल-सुश्मिता झाल्या सहभागी...  
शबाना आझमी यांनी आयोजित केलेल्या या चॅरिटी शोमध्ये सुष्मिता सेन, काजोलसह बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सुश्मिताने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली सिल्व्हर यलो साडी कॅरी केली होती. तर काजोलसुद्धा मनीष यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट साडीत दिसली. श्रीदेवी, डायना पेंटी, अमायरा दस्तूर, हुमा कुरैशी, सयामी खेर, श्रिया सरन, संगीता बिजलानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या चॅरिटी शोमध्ये आपला सहभाग नोंदवला.  

पुढील स्लाईड्सवर बघा, चॅरिटी शोमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे खास Photos...  
बातम्या आणखी आहेत...