आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Loves To Take Shower With Younger Son AbRam

चिमुकल्या अबरामसोबत अंघोळ करणे आहे शाहरुख खानला पसंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहरुख खानने सोमवारी मुंबईतील हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये मीडियासोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने केक कापला आणि मीडियाच्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे दिली.
यावेळी एका रिपोर्टरने शाहरुखला प्रश्न विचारला, की बिझी शेड्युलमधून वेळ काढून तुला कोणती गोष्ट करायला आवडते. याचे उत्तर देताना तो म्हणाला, मला माझा मुलगा अबरामसोबत बाथरुममध्ये अंघोळ करायला आवडते. कारण अंघोळीच्यावेळी एखादी व्यक्ती नॉर्मल वेळी जे कपडे परिधान करते, तसे तेथे करावे लागत नाही.
कुटुंबासोबत केक कापून यंदाचा वाढदिवस अगदीच साध्या पद्धतीने साजरा केला असल्याचे शाहरुखने यावेळी सांगितले. शिवाय मुलांकडून कोणतेही गिफ्ट मिळाले नसल्याचेही शाहरुखने सांगितले.
मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीविषयी शाहरुख म्हणाला, सध्या दोघेही शिकत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणते क्षेत्र निवडायचे, याचा सर्वस्वी निर्णय ते स्वतः घेतील. मी त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ताज लँड्स अँडमध्ये क्लिक झालेली शाहरुखची खास छायाचित्रे...