आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DDLJ Rewind! SRK Kajol Recreate Magic At Maratha Mandir As They Launch Song Gerua From Dilwale

'पलंगतोड' केमिस्ट्रीवर शाहरुख म्हणाला, 'काजोल आणि मी विवाहित आहोत, असे बोलू नका'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'दिलवाले' या सिनेमातील पहिले रोमँटिक गाणे रिलीज करण्यात आले. 'गेरुआ...' हे बोल असलेल्या गाण्याच्या लाँचिंगला शाहरुख-काजोलसह दिग्दर्शक रोहित शेट्टी, वरुण धवन, कृती सेनन आणि संगीतकार प्रीतम उपस्थित होते.
जाणून घ्या 'पलंगतोड' केमिस्ट्रीविषयी काय म्हणाला शाहरुख?
गेल्या एका मुलाखतीत दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने म्हटले होते, की शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री पलंगतोड आहे. याविषयी शाहरुखला प्रश्न विचारला असता, तो म्हणाला, ''आम्ही विवाहित आहोत. असे बोलू नका (हसून). एक स्टार्सच्या केमिस्ट्रीचे कौतुक एक दिलदारच करु शकतो. ते दोघेही पडद्यावर खूप सुंदर दिसतात.''
काजोलसाठी Baby Sitting करतो अजय देवगण
इव्हेंटमध्ये काजोलला विचारले गेले, असे कोणते रोमँटिक काम आहे, जे अजय देवगण तुझ्यासाठी करतो? याचे उत्तर देताना ती म्हणाली, ''घरी तो मुलांची काळजी घेतो, तेव्हा तो मला सगळ्यात रोमँटिक वाटतो. त्याच्यामुळेच मी घराबाहेर पडू शकले आणि दिलवाले करु शकले. ही इज बेस्ट.''
'गेरुआ...'चे शूटिंग होते आव्हानात्मक
शाहरुख आणि काजोलच्या मते, या गाण्याचे शूटिंग अतिशय चॅलेंजिंग होते. बर्फाळ ठिकाणी शूटिंग झाले. काजोल सांगते, ''थंडीमुळे आमचे होठ नीळे पडले होते. तीन जॅकेट घातल्यानंतरसुद्धा आम्ही थंडीने कुडकुडत होतो.'' तर शाहरुखने सांगितले,'' एका सीनमध्ये माझे आणि काजोलचे पाय बांधण्यात आले होते आणि हेलिकॉप्टरने शूटिंग झाले होते. शूटिंग करणे अतिशय कठीण होते.''
टीमने केली भरपूर धमाल
'दिलवाले'च्या या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सिनेमाच्या टीमने भरपूर धमाल केली. शाहरुखने कृतीसोबत तर काजोलने वरुण धवनसोबत डान्स केला. दिलवाले हा सिनेमा येत्या 18 डिसेंबर रोजी रिलीज होणारेय.
पुढे पाहा, प्रमोशनल इव्हेंटमध्ये क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...