आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Pays Tribute To The Martyrs Of 26 11 At Dilwale New Song Launch

शाहरुखने वाहिली 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली, लाँच केले 'दिलवाले'चे दुसरे साँग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान, काजोल, वरुण धवन, कृती सेनन आणि डायरेक्टर रोहित शेट्टी - Divya Marathi
शाहरुख खान, काजोल, वरुण धवन, कृती सेनन आणि डायरेक्टर रोहित शेट्टी

मुंबईः अभिनेता शाहरुख खानने आपल्या आगामी 'दिलवाले' या सिनेमाच्या टीमसोबत 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. काजोल, वरुण धवन, कृती सेनन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यासोबत मिळून त्याने शहीदांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन बाळगले.
लाँच केले सिनेमातील दुसरे गाणे
या इव्हेंटमध्ये शाहरुखने 'दिलवाले' या सिनेमातील दुसरे 'मनमा एमोशनल...' लाँच केले. या रोमँटिक गाण्यात वरुण धवन आणि कृती सेनन यांची कूल केमिस्ट्री बघायला मिळत आहे.
'Bigg Boss-9' मध्ये दोनदा होणार दिलवालेचे प्रमोशन
मीडियाशी बोलताना अभिनेता वरुण धवनने सांगितले, की तो कृतीसोबत पुढच्या आठवड्यात 'बिग बॉस'च्या स्पेशल एपिसोडमध्ये दिसणार आहे. त्यानंतर लगेचच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अभिनेता शाहरुख खान काजोलसोबत याच शोमध्ये 'दिलवाले'चे प्रमोशन करताना दिसणार आहे. एकंदरीत दोनदा सलमान खानचा शो शाहरुखच्या सिनेमाचे प्रमोशन करणार आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 18 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. या सिनेमात या चौघांव्यतिरिक्त बोमन इराणी, वरुण शर्मा आणि जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दिलवाले'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...