आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Skips, Salman Khan Spotted At Baba Siddiqui\'s Iftar Party!

बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमानसह जमली सेलेब्सची मांदियाळी, शाहरुख गैरहजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पार्टीत सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि वरुण धवन)
मुंबईः रविवारी रात्री काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. गेल्या दोन वर्षांपासून शाहरुख आणि सलमान खान या पार्टीत आकर्षणाचे केंद्रबिंदू असायचे. यावर्षी मात्र सलमाननेच पार्टीला हजेरी लावली. शाहरुख या पार्टीत सहभागी झाला नाही. 2013 आणि 2014 मध्ये या पार्टीत सलमान आणि शाहरुख आपल्या वाद विसरुन एकत्र सहभागी झाले होते. याच पार्टीत हे दोघे गळाभेट घेताना दिसले होते.
यावर्षी मात्र शाहरुख खान 'दिलवाले' या आगामी सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने बुल्गारिया येथे आहे. त्यामुळे तो इफ्तार पार्टीत सहभागी होऊ शकला नाही. सलमानसोबत वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, कबीर खान, त्यांची पत्नी मिनी माथुर, अर्पिता खान, तिचा नवरा आयुष शर्मा, हुमा कुरैशी, संगीता बिजलानी, आदित्य पंचोली, त्याची पत्नी जरीना वहाब, जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज सहभागी झाले होते. मुंबईतील ताज लँड अँडमध्ये ही पार्टी ठेवण्यात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत जमलेली सेलिब्रिटींची मांदियाळी...