आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Starrer Fan Trailer Launch At Yash Raj Studio

\'FAN\'च्या ट्रेलर लाँचिंगवेळी म्हणाला शाहरुख, \'गौरवसारखा फॅन भेटला तर चोप देईल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फॅन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये शाहरुख खान - Divya Marathi
'फॅन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये शाहरुख खान
मुंबई- सोमवारी (28 फेब्रुवारी) मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये शाहरुख खान स्टारर 'फॅन' सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट झाला. हा सिनेमात एका सुपरस्टार (आर्यन) आणि त्याच्या फॅनची (गौरव) कहाणी आहे. हा चाहता दीवानगीच्या सर्व मर्यादा ओलांडतो. मीडियासोबत बातचीत करताना शाहरुखने सांगितले, 'ख-या आयुष्यात जर गौरवसारखा क्रेझी चाहता भेटला तर मी त्याला समजावेल, पण त्याने ऐकले नाही तर त्याला मी चोप देईल.'
जेव्हा शाहरुखला बसली कानशिलात...
आपल्या संघर्ष काळातील दिवस आठवून शाहरुखने सांगितले, की जेव्हा तो दिल्लीहून मुंबईला आला होता, तेव्हा एका महिलेने त्याच्या कानशिलात लगावली होती. कारण तो तिला त्याच्या रिझर्व्ह सिटवरून उठवत होता. शाहरुख सांगतो, की त्याला माहित नव्हते मुंबईत आल्यानंतर सर्व रेल्वे लोकल होतात. म्हणून जेव्हा लोक त्यांच्या रिझर्व्ह सिटवर बसले, की तो उठवायचा. तेवढ्यात एका महिलेने त्याच्या थोबाडीत मारली आणि म्हणाली सर्वांना ट्रेनमध्ये बसण्याचा हक्क आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ट्रेलर लाँचिंगच्या इव्हेंटमध्ये काय-काय म्हणाला शाहरुख...