मुंबईः अलीकडेच लग्नबंधनात अडकलेला अभिनेता शाहिद कपूर सध्या पार्टी मूडमध्ये आहे. अलीकडेच शाहिद आणि त्याची नववधू मीरा यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर्ससाठी बुधवारी रात्री एक पार्टी आयोजित केली होती. या न्यूली मॅरीड कपलच्या पार्टीत करण जोहर, झोया अख्तर, अनुराग कश्यप यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले होते. हे सर्व स्टार्स पार्टी एन्जॉय करुन शाहिदच्या जुहूस्थित अपार्टमेंटमधून बाहेर पडताना कॅमे-यात कैद झाले.
शाहिदसोबत 'कमीने' आणि 'हैदर' या सिनेमांमध्ये काम करणारे दिग्दर्शक विशाल भारद्वाज या पार्टीत पत्नी रेखा आणि मुलगा आसमान भारद्वाजसोबत पोहोचले होते. याशिवाय दिग्दर्शक विकास बहल, निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला, डिझायनर मसाबा गुप्ता आणि तिचे पती निर्माता मधु मंतेना या पार्टीत सहभागी झाले होते.
शाहिद अलीकडेच म्हणजे 7 जुलै रोजी दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत विवाहबद्ध झाला. 12 जुलै रोजी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यामध्ये अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, सोनम कपूर, कंगना रनोटसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिदच्या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...