आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : शाहिद-मीराच्या रॉयल रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी नव्हे कुटुंबीयांनी लावले चारचाँद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे - शाहिद कपूरची सख्खी आई नीलिमा आणि उजवीकडे - पंकज कपूर यांची
दुसरी पत्नी आणि शाहिदची सावत्र आई सुप्रिया पाठक.)
नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत 7 जुलै रोजी लग्नगाठीत अडकले. लग्नानंतर मीराच्या कुटुंबीयांनी 7 जुलैलाच गुडगांव येथील हॉटेल ओबरॉयमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडमधून कुणीच उपस्थित नव्हते. केवळ फॅमिली फ्रेंड्स आणि कुटुंबीयांसाठी हे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. रिसेप्शनला शाहिदची सख्खी आई म्हणजे नीलिमा अजीम आणि सावत्र आई सुप्रिया पाठक पोहोचल्या होत्या.
आता येत्या 12 जुलै रोजी शाहिदच्या कुटुंबीयांनी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसाठी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे रिसेप्शन आयोजित केले आहे. 12 जुलै अर्थातच रविवारी रात्री साडे आठपासून या रिसेप्शनला सुरुवात होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गुडगांव येथे पार पडलेल्या रिसेप्शनला पोहोचलेल्या पाहुण्यांची छायाचित्रे...