आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीद कपूरने सेलिब्रेट केला पत्नीचा बर्थडे, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली मीरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत 23 वर्षांची (7 सप्टेंबर) झाली आहे. शाहीदने पत्नीचा वाढदिवस मीशाबरोबर सेलिब्रेट केला. तिघांनी घरामध्येच मागच्या बाजुला केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर ते आईस्क्रीम खायला गेले. रात्री शाहीदने वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी हायएंड रेस्तरॉमध्ये पार्टी दिली. यावेळी शाहीदचा लहान भाऊ ईशान खट्टर आणि त्याचे काही मित्रही होते. यावेळी मीरा सिम्पल मेकअप, ब्लू आणि ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तर साहीद सिम्पल लूकमध्ये होता. शाहीद-मीराने मीडिया फोटोग्राफर्सनाही भरपूर पोज दिल्या. ईशानने भैया-भाभीबरोबर फोटो क्लिक करून घेतले. 

इन्स्टाग्रामवर शेअर केले PHOTOS 
शाहीदने मुलगी मीशा आणि मीराबरोबरचा केक कापतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमधघ्ये लिहिले, 'Guess who finished mommy's birthday cake 😂😂'. दुसऱ्या एका फोटोबरोबर त्याने लिहिले, 'Birthday party in the backyard. #justus happy birthday my love @mira.kapoor ❤️❤️❤️'. ज्या रेस्तरॉमध्ये शाहीद-मीरा मित्रांबरोबर पार्टीसाठी गेले होते, त्याच रेस्तरॉमधून संजय दत्त कुटुंबीयांसहडिनर करुन बाहेर आला होता. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, शाहीद मीराचे 4 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...