आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-मीराच्या रिसेप्शनला स्टार्सची मांदियाळी, बिग बींनी शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची मीरा राजपूत यांच्या लग्नाचे रिसेप्शन रविवारी (12 जुलै) रात्री मुंबईच्या लोअर परेल परिसरात असलेल्या पॅलेडेयिम हॉटेलमध्ये झाले. रात्री 8:30 वाजता सुरु झालेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकार दिसले. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, आलिया भट्ट, सोनम कपूर, कंगना राणावत, जेनेलिया डिसूजा, श्रध्दा कपूर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, अनुराग कश्यपसह अनेक बॉलिवूडकर पोहोचले होते. गेल्या मंगळवारी (7 जुलै) शाहिद आणि मीरा गुडगाव येथे लग्नगाठीत अडकले.
अमिताभ यांनी शेअर केले फोटो-
रिसेप्शनमध्ये शाहिदने एक थ्री पीस सूट परिधान केला होता, हा सूट मित्र आणि डिझाइनर कुणाल रावलने डिझाइन केला होता. मीराने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ब्लू आणि व्हाइट कलरचा ड्रेस परिधान केलेला होता. पार्टीत सर्वप्रथम हजेरी लावणा-या पाहूण्यांमध्ये अमिताभ बच्चन होते. त्यांनी शाहिद-मीरासह पंकज कपूर यांच्या गप्पा मारल्या. त्यानंतर अमिताभ यांनी रिसेप्शनचा फोटो फेसबुकवर शेअर केला.
सिक्युरिटी गेटपासने मिळाली पाहूण्यांना एंट्री-
शाहिदच्या वेडिंग रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका रविश कपूर यांनी डिझाइन केली होती. त्यामध्ये क्रोम प्लेटेड रिमूव्हेबल इनव्हिटेशन होते, ही निमंत्रण पत्रिकाच पाहूण्यांचा गेटपास होता. निमंत्रण पत्रिकेशिवाय कुणालाही आत प्रवेश दिला गेला नाही. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेप्रमाणेच यामध्येसुध्दा 'नो गिफ्ट प्लीज, ब्लेसिंग ऑनली' असे लिहिले होते.

वेन्यूचे डिझाइन आणि मेन्यू-

रिसेप्शनचे स्थळ विवाह वेडिंग डेकोर कंपनीची स्टायलिस्ट रचना लकनोवालाने डिझाइन केले. तिने सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या रिसेप्शनचा वेन्यूसुध्दा डिझाइन केला होता. दिल्लीमध्ये शाहिदच्या लग्नात केवळ शाकाहारी पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच मुंबईमध्ये झालेल्या या रिसेप्शनमध्ये दोन्ही प्रकारचे (शाकाहारी-मांसाहारी) पदार्थ सर्व्ह केले गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिदच्या रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या बॉलिवूड कलाकारांची खास झलक...