आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Kapoor Late Night Party With Katrina Kaif, Sidharth Malhotra, Aditya Roy Kapur

वडिलांच्या Warning नंतरसुद्धा पहाटे 4 पर्यंत पार्टी करताना दिसली श्रद्धा कपूर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा कपूर आणि कतरिना कैफ - Divya Marathi
श्रद्धा कपूर आणि कतरिना कैफ

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूर सोमवारी रात्री एका पार्टीत सोबत होते. दिग्दर्शक शाद अलीच्या घरी आयोजित या पार्टीत श्रद्धा तिच्या आगामी 'ओके जानू' या सिनेमातील तिचा को-स्टार आदित्यसोबत रात्री साडे अकराच्या सुमारास पार्टीत दाखल झाली. तर कतरिना कैफ अलीकडेच रिलीज झालेल्या 'बार बार देखो' सिनेमातील तिचा हीरो सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली. कतरिना तर पार्टीतून लवकर निघून गेली. मात्र श्रद्धा, आदित्य आणि सिद्धार्थ पहाटेच्या चार वाजेपर्यंत पार्टी एन्जॉय करत राहिले.

श्रद्धाच्या वडिलांनी दिली वेळेत घरी येण्याची ताकिद...
अलीकडेच बातमी आली होती, की श्रद्धाचे वडील शक्ती कपूर आणि आई शिवांगी कपूर श्रद्धावर नाराज आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार शक्ती आणि शिवांगी यांनी श्रद्धाला कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यायला सांगितले आहे. श्रद्धा सध्या रोज रात्री उशीरा घरी येत असल्याचे समोर आले आहे. ती सायंकाळी शुटिंग उरकते आणि वरचेवर गर्ल गँगबरोबर आऊटिंगला जाते, असे समोर आले आहे. त्यामुळे वडिलांनी तिला घरी वेळेत येण्याची ताकिद दिली होती. वडिलांच्या वॉर्निंग नंतरसुद्धा श्रद्धा उशीरा रात्रीपर्यंत पार्टी करताना दिसल्याने तिच्यावर वडिलांच्या ओरडण्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...