आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIJW DAY-1: स्टनिंग लूकमध्ये सोनम-सानिया, ब्राइडल लूकमध्ये दिसली चित्रांगदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIJW 2015च्या पहिल्या दिवशी रॅम्पवर चित्रांगदा सिंग, सोनम कपूर आणि सानिया मिर्जा - Divya Marathi
IIJW 2015च्या पहिल्या दिवशी रॅम्पवर चित्रांगदा सिंग, सोनम कपूर आणि सानिया मिर्जा

एन्टरटेन्मेंट डेस्कः इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक 2015 (IIJW)च्या सहाव्या पर्वाला मुंबईत सोमवारी सुरुवात झाली. IIJWच्या पहिल्या दिवशी बी टाऊनच्या अभिनेत्री चित्रांगदा सिंग आणि सोनम कपूर रॅम्पवर आपला जलवा दाखवताना दिसल्या.
Michael Costelloच्या आउटफिटमध्ये सोनम
जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशनल काउंसिल (GJEPC) ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडक असलेली सोनम कपूर रॅम्पवर ग्रीन कलरच्या बॅकलेस गाऊनमध्ये अवतरली. तिने डिझायनर Michael Costello ने डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता. या लूकसोबत डायमंड इअररिंग्स, ब्रेसलेट आणि रिंग घातली होती. सोनमचा हा लूक एलिगेंट आणि स्टनिंग दिसला.
शोभा श्रृंगारची शो-स्टॉपर बनली चित्रांगदा
IIJW च्या पहिल्या दिवशी बॉलिवूड ब्युटी चित्रांगदा सिंग पिंक आणि गोल्डन लहेंग्यात गुजराती नववधूच्या रुपात रॅम्पवर अवतरली. तिने डिझायनर सुमित दास गुप्ताने डिझाइन केलेला ब्राइडल लहेंगा कॅरी केला होता. तिने शोभा श्रृंगारच्या गोल्ड नेकलेस, चेन इअररिंग्स आणि ब्रेसलेट या दागिन्यांनी आपला लूक पूर्ण केला.
सोनम आणि चित्रांगदासोबतच सानिया मिर्जा आणि जुही चावलासुद्धा रॅम्पवर आपल्या अदा दाखवताना दिसल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा IIJWच्या पहिल्या दिवशी रॅम्पवर अवतरलेल्या अभिनेत्रींची खास झलक...