आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन शोमध्ये पहिल्यांदा दिसली बिग बींची नात नव्या नवेली, शो स्टॉपर बनली सोनम कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या नवेली, IBFWमध्ये फॅशन डिझायनरसोबत सोनम कपूर - Divya Marathi
नव्या नवेली, IBFWमध्ये फॅशन डिझायनरसोबत सोनम कपूर

नवी दिल्लीत डीएलएफ एम्पोरियो मॉलमध्ये शुक्रवारी इंडिया ब्राइडल फॅशन वीक 2015 (IBFW) या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. येथे सोनम कपूर डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांच्या कलेक्शनसाठी रॅम्पवर अवतरली होती. इव्हेंटमध्ये सोनमने रेड अँड गोल्डन लहेंग्यामध्ये दिसली. तिने यावर दागिने घातले नव्हते. आपल्या लूकला तिने रेड लिपस्टिकने पूर्ण केले.
शो-स्टॉपर बनलेल्या सोनमने नक्कीच येथे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र सोनमशिवाय अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीसुद्धा येथे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. एखाद्या फॅशन शोमध्ये सहभागी होण्याची ही नव्याची तशी पहिलीच वेळ होती. येथे ती आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदासोबत आली होती. मोकळे केस, सिंपल मेकअप आणि रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नव्या सुंदर दिसत होती. या इव्हेंटमध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया त्यांची धाकटी मुलगी रिंकी खन्नासोबत येथे दिसल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, IBFWमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...