मुंबईः सोनम कपूर, परिणीती चोप्रा, यामी गौतम या अभिनेत्री बुधवारी रात्री मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये 'मसान' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या. सोनमच्या मते, ''मसान हा एक मस्ट वॉच सिनेमा आहे''. यामीने सांगितले, ''हा मनापासून बनवण्यात आलेला सिनेमा असून लोकांच्या मनाचा ठाव घेतो''. तर परिणीतीने सांगितले, 'मी सिनेमा बघताना खूप रडले. हा हार्ट टचिंग सिनेमा आहे.''
Girls In Blue
बी टाऊनच्या या तिन्ही अभिनेत्री स्क्रिनिंगला ब्लू आउटफिटमध्ये दिसल्या. परिणीतीने कॅज्युअल लूक निवडता. सोनमने प्रिंटेड टॉप स्कर्टसोबत ओवर साईज्ड नेव्ही ब्लेजर कॅरी केले होते. विक्की डोनर फेम यामी गौतम ब्लू जम्पसूटमध्ये दिसली.
अनेक सेलिब्रिटींनी पाहिला सिनेमा
स्क्रिनिंगला अभिनेते नसीरुद्दीन शाह पत्नी रत्ना पाठक आणि मुलगा विवान शाहसोबत दिसले. अभिनेता कुणाल कपूर, दिव्या दत्ता, दिग्दर्शक कबीर खान, मिनी माथूर, दिग्दर्शक अनुराग कश्यप, रागिनी खन्ना हे सेलेब्स मसानच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते.
'मसान' हा सिनेमा येत्या 24 जुलै रोजी रिलीज होणार अशून 68 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचे खूप कौतुक झाले होते. नीरज घायवन दिग्दर्शित या सिनेमात ऋचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी, संजय मिश्रा आणि विक्की कौशल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...