आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ट्रेलरच्या लाँचिंगला सलमानच्या गळ्यात पडून रडला 'हीरो' सूरज पांचोली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रेलर लाँचिंगला सलमान खान, अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली.)
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा आगामी 'हीरो' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. बुधवारी (15 जुलै) या सिनेमाचा मुंबईत ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमातील लीड अॅक्टर्स सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी हजर होते. मंचावर येताच सूरज सलमान खानची गळाभेट घेताना रडू लागला. सलमानने त्याची समजूत घालून त्याला शांत केले.
इव्हेंटमध्ये सलमान ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तर सूरज येथे व्हाइट शर्ट, ब्लू कोर्ट आणि डेनिम्समध्ये दिसला. तर अॅक्ट्रेस अथिया शेट्टीने डिझायनर नेहा तनेजाच्या कलेक्शनमधील ब्लू टी लेंथ फुल स्कर्ट कॅरी केला होता. या तिघांव्यतिरिक्त इव्हेंटमध्ये डायरेक्टर निखिल आडवाणी, निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेता सुनील शेट्टी आणि आदित्य पांचोली हे स्टार्स उपस्थित होते.
सूजला कोसळले रडू, नर्व्हस दिसली अथिया
सूरज आणि अथियाचा हा पहिलाच मीडिया अपिअरन्स होता. मात्र हा अपिअरन्स लक्षवेधी ठरला नाही. मंचावर येताच सूरजला रडू कोसळले. तो सलमानच्या गळ्यात पडून रडताना दिसला. तर अथिया इव्हेटंमध्ये थोडी नर्व्हस दिसली. मंचावर एन्ट्री घेताना आणि फोटोग्राफर क्लिक करताना तिचा तोल गेला होता.
सूरजला पायलट बनवण्याची होती त्याच्या आईची इच्छा
सूरजने लीड अॅक्टर म्हणून बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होता. मात्र अभिनेता होण्याची त्याची इच्छा नव्हती. सूरजने सांगितले, त्याची आई जरीना वहाब यांची इच्छा होती, की त्याने पायलट बनावे. मात्र सूरज गणितात कच्चा असल्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अभिनय करण्यापूर्वी सूरजने सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. मात्र सलमानने त्याच्यातील टॅलेंट ओळखले आणि अभिनयाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
''स्क्रिनवरील माझा आत्मविश्वासच माझे वैशिष्ट्य आहे'' - अथिया
अथिया हीरो द्वारे बी टाऊनमध्ये डेब्यू करत आहे. मात्र आपल्या स्क्रिन प्रेजेंसविषयी ती भलतीच आत्मविश्वासी आहे. जेव्हा तिला तिचा USP (unique selling proposition) काय आहे? हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याचे उत्तर देताना ती म्हणाली, ''माझा आत्मविश्वासच माझा USP आहे. त्यामुळेच मी स्क्रिनवर नॅचरल अॅक्टिंग करु शकते.''
अथियाला तरुण अभिनेत्यासोबतच साइन करु इच्छित होता सलमान
आजच्या काळात खरं तर बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्री येथील मोठ्या वयाच्या अभिनेत्यांसोबत काम करण्यास इच्छूक असतात. मात्र अथियाने हा ट्रेंड फॉलो करु नये, अशी सलमानची इच्छा होती. सलमान म्हणाला, ''अथियाने अधिक मेहनत करावी, असे मला वाटते. तिने आपल्या वयाच्या अभिनेत्यासोबत काम करावे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमधील खास छायाचित्रे...