आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धाकटा भाऊ अबरामला कडेवर घेऊन एअरपोर्टवर दिसला SRK चा मोठा मुलगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आर्यन खानच्या कडेवर अबराम खान)
मुंबईः शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान सर्वात क्युट आणि नेहमीच चर्चेत राहणारा स्टार किड आहे. शनिवारी अबराम त्याचा थोरला भाऊ आर्यन खानच्या कडेवर मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसला. 17 वर्षीय आर्यन आपल्या धाकट्या भावासोबत कारमध्ये बसताना दिसला.
काही दिवसांपूर्वी शाहरुख आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत लंडनमध्ये सूटी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. हॉलिडे एन्जॉय केल्यानंतर शाहरुख आणि गौरी खान त्यांची तिन्ही मुले आर्यन, सुहाना आणि अबरामसोबत शनिवारी मुंबईत परतले.
शाहरुख सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यामध्ये काजोल त्याची को-स्टार आहे. काजोल-शाहरुखच्या सुपरहिट जोडीसोबत दिलवालेमध्ये वरुण धवन आणि कृती सेननसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर स्पॉट झालेली शाहरुख खानच्या फॅमिली मेंबर्सची छायाचित्रे....