आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रईस’ आणि ‘सुल्तान’ राहणार आमने-सामने ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख अभिनीत ‘रईस’ २०१६ मध्ये ईदला प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली. आता सलमान खानचा ‘सुल्तान’देखील याच तारखेला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आगामी वर्षात हे दोन चित्रपट जाणून-बुजून एकाच दिवशी प्रदर्शित करण्यात येत आहेत. १८ डिसेंबर ही रिलीज डेट निश्चित करण्यात आलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ला शाहरुख-काजोल जोडीचा ‘दिलवाले’ याच तारखेला प्रदर्शित करण्यात येणार असल्याच्या घोषणेने मोठा धक्का बसला. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीने शाहरुखसोबतचा ‘रईस’ २०१६ मध्ये ईदला रिलीज करण्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वीच केली होती. मात्र यशराज बॅनरचा सलमान खानसोबतचा ‘सुल्तान’ चित्रपट देखील याच तारखेला रिलीज करण्यात येणार असल्याने दोन्ही चित्रपटांसमोर पेच निर्माण झाला आहे.
‘सुल्तान’बाबत निर्माता आदित्य चोप्राने घेतलेल्या या निर्णयाला तज्ज्ञांनी चूक ठरवले आहे. वास्तविक सलमान अभिनीत हा चित्रपट मोठा असला तरी रितेश सिधवानी देखील ‘रईस’ची डेट बदलण्यास तयार नाहीत. ‘सुल्तान’च्या रिलीज डेटची घोषणा केल्यानंतर रितेशने ट्विट केले की, ‘आम्ही फेब्रुवारीमध्ये रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यामुळे आमचा चित्रपट २०१६ मध्ये ईदलाच प्रदर्शित होईल. आमच्या नियोजनानुसार आम्ही काम करतोय.’