(कंगना राणावत, इम्रान खान, दीपिका पदुकोण, रेखा)
मुंबई- रविवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रेखा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. शिवाय 'कट्टी-बट्टी'ची टीम अर्थातच कंगना राणावत आणि अभिनेता इम्रान खानसुध्दा एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसले.
ऑस्ट्रेलियाहून परतली 'कट्टी-बट्टी'ची टीम-
'कट्टी-बट्टी' या आगामी सिनेमाची मुख्य कलाकार कंगना राणावत आणि इम्रान खान मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी कंगना पिंक पोलका डॉटेट Red Valentino कोटमध्ये दिसली. तिने आपल्या लूकला ऑरेंज शॉर्ट स्कर्ट आणि ब्लॅक शूज आणि पर्पल शेड्सने पूर्ण केले होते. तसेच इम्रान ब्लू टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये दिसला. ही जोडी मेलबर्नमध्ये आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2015मध्ये सहभाग घेण्यासाठी पोहोचले होते.
एअरपोर्टवर दीपिका आणि रेखा-
गतकाळातील अभिनेत्री रेखा मुंबई एअरपोर्टवर दीपिका पदुकोणसोबत दिसल्या. दोघीजणी हसताना एअरपोर्टच्या बाहेर पडल्या. यावेळी दीपिका टी-शर्ट, डेनिम्स आणि ब्लॅक शेड्समध्ये दिसली. तसेच रेखा ब्लॅक अँड व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्समध्ये क्लिक झाल्या. सध्या दीपिका दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' आणि इम्तियाज अलीच्या 'तमाशा' सिनेमामध्ये बिझी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, एअरपोर्टवर दिसलेल्या सेलेब्सची खास झलक...