मुंबई : अलीकडेच बच्चन फॅमिली मुंबईतील वांद्रा परिसरातील रॉयल चाइन हाऊस रेस्तराँमध्ये एन्जॉय करताना दिसली. बिग बींची मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि तिची दोन मुले नव्या नवेली आणि अगस्त्य हॉटेल बाहेर क्लिक झाले. यावेळी तिघेही स्टायलिश लूकमध्ये दिसले. श्वेता व्हाइट ट्राउजर आणि टॉपमध्ये दिसली. तिची लेक नव्या व्हाइट जीन्स आणि ग्रे बलून टॉपमध्ये तर मुलगा अगस्त्य व्हाइट शर्ट आणि ब्लॅक शूजमध्ये दिसला.
पार्टीत बिग बींची पुतणी नैना बच्चन तिचा नवरा कुणाल कपूरसोबत दिसली. याशिवाय श्वेताचा नवरा निखिल नंदा, आमिर खानची पत्नी किरण रावसुद्धा येथे दिसले. पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेकनेसुद्धा धमाल केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रेस्तराँबाहेर क्लिक झालेली बच्चन कुटुंबीयांची छायाचित्रे...