आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: सलमान-शाहरुखने होस्ट केला अवॉर्ड शो, रेड कार्पेटवर अवतरले बी टाऊनचे लखलखते तारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: रविवारी रात्री मुंबईत स्टार स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 2016 मधला हा पहिला असा अवॉर्ड सोहळा आहे, जो शाहरुख खान आणि सलमान खान या जोडीने होस्ट केला. यावेळी शाहरुख-सलमानने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. स्टेजवर दोघांची एन्ट्री होताच 'करण-अर्जुन' या सिनेमातील गाणे वाजवण्यात आले. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्म केले. यावेळी सोनम कपूर रेखा यांच्या गाजलेल्या गाण्यांवर थिरकताना दिसली. रेखा यांना मिळाला जीवनगौरव...

या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्री रेखा यांना सिनेसृष्टीतील मौल्यवान कामिगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी पुरस्कार घेण्यासाठी रेखा स्टेजवर आल्यानंतर त्यांनी 'परदेसिया' या त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर ताल धरला. टायगर श्रॉफ, जरीन खान आणि सलमान खान यांनीही यावेळी एकाहून एक सादरीकरण केले.
दीपिकाला मिळाला स्टाइल आयकॉन अवॉर्ड...
अवॉर्ड नाइटमध्ये दीपिका पदुकोणला स्टाइल आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर वरुन धवनला बेस्ट कॉमेडिअनचा अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी वरुण त्याचे वडील डेविड धवन यांच्यासोबत मंचावर आला. पुरस्कार स्वीकारताना वरुण इमोशनल झालेला दिसला. यावेळी सुशांत सिंह राजपूतला बेस्ट अॅक्टर क्रिटिक अवॉर्ड देण्यात आला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्टार स्क्रीन अवॉर्डच्या रेड कार्पेटचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...