Home »Party» Sunny Leone And Daniel Weber Celebrated Their Daughter Second Birthday In US

2 वर्षांची झाली सनी लिओनीची लेक, US मध्ये सेलिब्रेट केला चिमुकलीचा बर्थडे

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 18:41 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी याचवर्षी जुलै महिन्यात लातूर येथून एक मुलगी दत्तक घेऊन तिचं पालकत्त्व स्वीकारले. निशा कौर वेबर असे त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवले आहे. अलीकडेच सनी आणि डॅनियल यांनी अरिजोना (US) येथे निशाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. निशाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो सनीने शेअर केला असून यामध्ये निशाच्या डोक्यावर प्रिन्सेस क्राऊन दिसत असून ती तिच्या आईवडिलांसोबत पोज देताना दिसतेय.

21 महिन्यांच्या निशाला घेतले दत्तक...
- सनी लिओनीने 21 महिन्यांच्या निशाला दत्तक घेतले.
-‘मी निशाचा फोटो ज्यावेळी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा आनंद आणि भावनांनी मी सद्गदीत झाले होते. (हसून) पालकत्वासाठी नऊ महिन्यांची वाट पाहावी लागते. पण, आमच्या बाबतीत तीन आठवड्यांमध्ये हे सर्व काही निश्चित करण्यात आलं’, असं सनीने निशाला दत्तक घेतल्यानंतर सांगितले होते.
- डॅनिअलनेही त्यांच्या कुटुंबातील नव्या आणि गोंडस पाहुणीच्या येण्याचा आनंद व्यक्त करताना म्हटले होते, ‘आमचं आयुष्य फार वेगळं आहे. इथे नऊ महिन्यांचा काहीही संबंध नव्हता. माझ्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया भरपूर कागदपत्र आणि दोन वर्षांपासून सुरु असलेली प्रक्रिया होती. एके दिवशी अचानक मला मेल आला हे सगळं सुखद होतं. दोन वर्षांपूर्वी आम्ही एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती. त्यावेळीच आम्ही हा निर्णय घेतला होता.’

आम्ही नव्हे निशानेच केली आमची निवड...
- ‘आम्ही निशाची नाही तर, निशानेच आमची निवड केलीये. तर खुद्द डॅनिअलला अजूनही त्यांनी ही मुलगी दत्तक घेतल्याचा विश्वास बसत नाहीये. त्याने अनाथ आश्रमासाठी काम करण्याऱ्यांचे आभार मानले असून त्यांची प्रशंसा केली. तिला मी स्वत: जन्म दिला नाहीये. पण, तरीही कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी आम्ही मुलगी दत्तक घेण्याचा विचार का करु नये? असं म्हणत सनीने निशाला दत्तक घेण्याचं कारण स्पष्ट केलं होतं.
- निशाच्या नावाविषयी सनी म्हणाली होती, ‘ते तिचं स्वत:चं नाव होतं. आमच्या विचारातही काही नावं होती पण, ती तिची स्वत:ची ओळख आहे.’

पुढील स्लाईड्सवर बघा, मुलगी निशासोबतचे सनी आणि डॅनियलचे 6 PHOTOS...

Next Article

Recommended