बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीचा पूर्वाश्रमीचा पती रिशी सेठियाने अलीकडेच दुसरे लग्न केले. प्रसिद्ध मॉडेल आणि ज्वेलरी डिझायनर क्वीनी सिंगसोबत रिशीने दुसरे लग्न थाटले. काही दिवसांपूर्वीच फ्रान्समध्ये दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला. फ्रान्सहून भारतात परतल्यानंतर मंगळवारी या नवदाम्पत्याने मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली.
मलायका अरोरा खान, संजय कपूर आणि त्याची पत्नी महिप, सुश्मिता सेन, अमिषा पटेल, कबीर बेदी आणि त्यांची पत्नी, पुनम ढिल्लन यांच्यासह बरेच सेलेब्स या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
विशेष म्हणजे क्वीनीचेही हे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नापासून तिला एक 17 वर्षांची मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिशी आणि क्वीनी रिलेशनशिपमध्ये होते. रिशी सेठियापासून विभक्त झाल्यानंतर नीलम कोठारीने टीव्ही अभिनेता समीर सोनीसोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर तिने एक मुलगीही दत्तक घेतली आहे.
पुढे पाहा, क्वीनी आणि रिशीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...