आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tanisha, Sanjay Dutt Manyata At Raj Bansals Son Abhimanyus Wedding

लग्नात संजयच्या गालावर दिसले लिपस्टिक, पाहा लग्नाचे 18 Inside Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरदेवासोबत अभिनेता संजय दत्त. संजयच्या गालावर लिपस्टिकचे डाग स्पष्ट दिसत आहेत. - Divya Marathi
नवरदेवासोबत अभिनेता संजय दत्त. संजयच्या गालावर लिपस्टिकचे डाग स्पष्ट दिसत आहेत.
जयपूरः बॉलिवूड अभिनेता संजय दत्त अलीकडेच पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले इब्राहिम, इकारासोबत जयपूरमध्ये होते. निमित्त होते संजयचा खास मित्र आणि चित्रपट वितरक राज बन्सल यांच्या मुलाच्या लग्नाचे. राज बन्सल यांचा मुलगा अभिमन्यूचा जयपूरमध्ये शाही थाटात लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्नात एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे यावेळी संजयच्या गालावर लिपस्टिक लागलेले दिसले. कुणीतरी संजयच्या गालावर किस केल्याचे यावरुन दिसून आले. गालावर लिपस्टिक लागल्याचे कदाचित संजयच्या लक्षात आले नसावे. म्हणून तो तसाच लग्नात सहभागी झाला.
कोणकोणते स्टार्स पोहोचले लग्नात...
- या लग्नात ग्लॅमर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. यामध्ये अजय देवगण, काजोल, तिनषा मुखर्जी यांच्या नावाचा समावेश आहे,.
- संगीत सेरेमनीत अभिनेते ऋषी कपूरसुद्धा सहभागी झाले होते.
- संगीत सेरेमनीत तनिषा मुखर्जी ठुमके लावताना दिसली.
- तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदाच आपल्या कुटुंबासोबत मुंबईबाहेर फिरायला आला.
कोण आहे राज बन्सल?
- राज बन्सल जयपूरमधील एक नामांकित बिझनेसमन आहेत.
- ते येथील अनेक मल्टीप्लेक्सचे मालक असून चित्रपट वितरणाचेही काम बघतात.
- याशिवाय ते लेखक आणि चित्रपट समीक्षकदेखील आहेत.
- संजय दत्तसोबतचे त्यांचे नाते खूप खास आहे. राज नेहमीच संजयसोबतची छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत असतात.

राजस्थानी अंदाजात होतोय लग्नसोहळा...
- हे लग्न जयपूरच्या एका फार्म हाऊसमध्ये आयोजित करण्यात आले होते.
- या लग्नात हेरिटेज लूकवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. लग्नानंतर रिसेप्शन जयपूरमध्ये ठेवण्यात आले.
मान्यता, तनिषा आणि चिमुकल्या इकराच्या हातावर सजली मेंदी...
- या लग्नात संजयची पत्नी मान्यताने आपल्या दोन्ही हातावर मेंदी काढून घेतली. विशेष म्हणजे तिची चिमुकली इकारासुद्धा हातावर मेंदी काढताना दिसली.
- तनिषा मुखर्जीसुद्धा यात मागे नव्हती. तिनेही आपल्या हातावर सुंदर मेंदी काढून घेतली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लग्नात सहभागी होण्यास जयपूरमध्ये पोहोचलेल्या संजय दत्तची खास छायाचित्रे...