आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतेभद विसरुन मलायका-अरबाजने सेलिब्रेट केला मुलाचा B'day, सलमान वगळता सर्व होते हजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅमिलीसोबत केक कापताना अरहान, त्याच्या मागे अरबाज-मलायका - Divya Marathi
फॅमिलीसोबत केक कापताना अरहान, त्याच्या मागे अरबाज-मलायका
मुंबई: मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले असून दोघेही आता वेगवेगळे राहात असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र फॅमिली फंक्शनमध्ये हे दोघे आवर्जुन एकत्र येतात. बुधवारी मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहानचा 14 वा वाढदिवस होता. या निमित्ताने फॅमिली डिनर आयोजित करण्यात आला होते. यावेळी सलमानला वगळता खान आणि अरोरा कुटुंबातील सर्व सदस्य अरहानच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. अरहानची मावशी आणि मलायकाची धाकटी बहीण अमृता अरोराने या सेलिब्रेशनचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एका फोटोत अरहान त्याच्या आईवडिलांसोबत केक कापताना दिसतोय. अरहान हा मलायका आणि अरबाजचा एकुलता एक मुलगा आहे.
अरबाजचे घर सोडून वेगळी राहतेय मलायका...

- काही दिवसांच्या डेटिंगनंतर 1998 मध्ये मलायका आणि अरबाजने लग्न केले होते. अरहान त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.
- 2016 च्या सुरुवातीपासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मलायका खान कुटुंबीयांचे वांद्रा येथील घर सोडून दुस-या ठिकाणी राहात आहे.
- 14 वर्षीय मुलगा अरहानसोबत मलायका खार येथील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे.
- मार्च महिन्यात दोघांनी त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे जगजाहीर केले होते.
- ते म्हणाले होते, "होय हे खरे आहे की आम्ही दोघेही एक ब्रेक घेत आहोत. मात्र याचा अर्थ लोकांनी आमच्याविषयी कुठलाही विचार करावा, असा होत नाही. आम्ही थोडा वेळ घेतयो. जेणेकरुन आमचे आयुष्य कुठे चालले, याचा आम्हाला विचार करता यावा."

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अरहानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...